ऑनलाईन क्लासमध्ये लागला पॉर्न व्हिडीओ, अश्लील आवाजांनी पालक झाले हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरातील शाळा बंद असून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग भरवले जात आहेत. त्यामुळे सध्या मुलं घरूनच अभ्यास करत आहेत.मात्र हिमाचल प्रदेशमधील एका शाळेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू असताना एकच गोंधळ उडाला. या क्लासमध्ये जे काही झालं ते पाहून विद्यार्थ्यांचे पालकही संतापले आहेत.

हिमाचल मधील सेंट ल्युकल या शाळेतील एका शिक्षक ऑनलाईन क्लास घेत होते. त्यावेळी अचानक क्लासच्या स्क्रिनवर पॉर्न व्हिडीओ लागला. व्हिडीओतून अश्लील आवाज येऊ लागले. त्या आवाजांमुळे मुलांचे पालकही हैराण झाले. त्यानंतर मुलांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी शाळकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान हे प्रकरण शाळेने गंभीरतेने घेतले असून ऑनलाईन क्लास सध्या बंद केले आहेत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकार शाळेची इमेज खराब करण्यासाठी घडवून आणल्याचा संशय शाळेने व्यक्त केली आहे.