
हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालानंतर पेमेंट्स कंपनी ब्लॉक इंकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. डोर्सी यांच्या कंपनीने त्यांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, जॅक डोर्सी यांच्या ब्लॉक इंकने फसवणूक करून आपल्या वापरकर्त्यांची संख्या वाढवली. त्याच वेळी, त्यांनी त्यांचा ग्राहक संपादन खर्च कमी केला. या बातमीनंतर ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअर्स मध्ये अजून 65% ते 75% पर्यंत घसरण होऊ शकते. मात्र, ब्लॉक इंक कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
गुरुवारी डॉर्सी यांच्या संपत्तीत 526.4 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 42 अब्ज आठ कोटी रुपये इतकी घट झाली. ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार डोर्सी यांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर त्यांची संपत्ती आता 4.4 अब्ज डॉलर इतकी आहे.
24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर देखील अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जगातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूहाला त्याचा मोठा झटका बसला व त्यांच्या शेअर्स मध्येही मोठी घसरण झाली.