महेश आणि चैताली अजिंक्य

424

के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालय रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला गटामध्ये अनुक्रमे विरारच्या विवा महाविद्यालयाचा महेश रायकर व डोंबिवलीच्या मॉडल महाविद्यालयाची चैताली सुवारे यांनी विजेतेपद पटकावले. आंतरमहाविद्यालय कॅरम स्पर्धा पी. डी. हिंदुजा ट्रस्टतर्फे के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालय यांच्या विद्यमाने त्यांच्याच जिमखान्यामध्ये प्राचार्य डॉ. मिनू मदलानी, शारीरिक शिक्षण निर्देशक महेश नायक, जिमखान्याचे कार्याध्यक्ष नीवेष विलेकर आणि श्रद्धा जैन, अध्यक्ष पूजा उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, ठाणे, पालघरच्या कानाकोपऱयातून 300 युवा खेळाडूंचा विक्रमी सहभाग लाभला. या स्पर्धेचे प्रमुख पंच व तांत्रिक संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्दन संगम यांनी उत्कृष्ट संचालन केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाच्या जिमखान्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसली.

आपली प्रतिक्रिया द्या