सुवर्ण महोत्सवी हिंदुस्थान बँकेच्या लोगोचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माथाडी कामगारांची बँक अशी प्रमुख ओळख असणाऱ्या दि हिंदुस्थान को. ऑप. बँक लिमिटेड, मुंबई या बँकेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त बँकेने आज लोगोचे अनावरण केले.बँकेच्या चुनाभट्टी येथील प्रशस्त जागेत बँकेचे अध्यक्ष गुलाबराव जगताप यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. लोगोच्या अनावरणप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश नार्वेकर, माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ संचालिका डॉ.मंजुषा जगताप, ज्येष्ठ संचालक कृष्णा मराठे, संपतराव गोडसे, हणमंत घनवट, भीमराव जाधव, सुरेश येशे, संगीता दुधाळ, बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे, बँकेचे सरव्यवस्थापक सुनील पटवर्धन आणि प्रसिद्ध बँकिंग तज्ञ संजय राणे तसेच बँकेचे सभासद, आणि अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.