मळणीयंत्रात अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गोरेगाव

सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे एका १९ वर्षीय शेतमजुराचा मळणी यंत्रात अडकुन मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दत्ता सुभाष धामनकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. .

हाताळा येथे गेल्या काही दिवसांपासुन सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु आहे. दत्ता देखील गुरुवारी सकाळी सोयाबीन काढण्यासाठी मळणीयंत्रावर गेला होता. उत्तम हिरामन खिल्लारे यांच्या गोरेगाव-हाताळा शिवातील शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरु होते. त्याचवेळी ट्रॅक्टर मालक शिवाजी विलास गोरे यांच्या मळणीयंत्रात दत्ताच्या गळ्यातील रुमाल अडकला व तो मळणी यंत्रात खेचला गेला. यात त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले. याबदद्ल कळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय माधव कोरंटलु यांच्यासह बीट जमादार भुमिराज कुंदरेकर, शेळके, शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दत्ताचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह मळणीयंत्रातुन बाहेर काढण्यात आला. नंतर गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटवण्यात आला. करण्यासाठी प्रेत आणले होते. मयत दत्ता धामणकर हा पळशी येथील रुख्मिणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याचे कुटूंब गावात मजुरीचे काम करते. ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करत असतांना दत्ता धामणकर याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.