ओम-मोनालिसा सांगणार ‘रावरंभा’ची कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचित आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराङ्गी रुपेरी पडद्यावर येण्यासाङ्गी सज्ज झाली आहे. ‘मुळशी पॅटर्न’फेम अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल ‘रावरंभा’ चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहेत. 12 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 ‘रावरंभा’ च्या पोस्टरमध्ये आसमंतात फडकणाऱया भगव्या झेंडय़ाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांसोबत दिसणारे ‘राव’ आणि ‘रंभा’ व त्यासोबत बेभान होऊन दौडणारे घोडेस्वार  दिसताहेत. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कडय़ाकपाऱयांत एक दुर्लक्षित, पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रति आणि स्वराज्याच्याप्रति असलेली निष्ठा,  शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितले.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे, तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत.