पुणे शहरातील कोथरूड परिसरातील इमारतीमध्ये दरोडा टाकताना पोलिसांना पाहून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न फरार झालेल्या सराईताला हडपसर पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सोमनाथ घारूळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हडपसरमधील बिराजदानगर रस्त्याने सराईत चोरीच्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक समीर पांडुळे आणि शाहिद शेख यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचून दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. त्याशिवाय कोथरूड परिसरातील इमारतीत दरोडा टाकताना पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत बल्लुसिंग टाक आणि उजालासिंग टाक यांच्यासोबत असल्याची कबुली सोमनाथने दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, एपीआय हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहिद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांनी केली.

























































