
सामना ऑनलाईन । जम्मू
जम्मूच्या बस स्थानकावर गुरुवारी सकाळी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जम्मूच्या बस स्थानकावर ग्रेनेड फेकणाऱ्या तरुणाला अटक केली असून त्याला हिजबुलच्या कमांडरने ग्रेनेड फेकण्याचे काम दिले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीमधील फुटेजच्या आधारे त्या तरुणाला अटक केली आहे. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा जम्मू कश्मीरमध्ये हाय अॅलर्ट घोषीत करण्यात आला आहे.
IGP Jammu, Manish K Sinha on explosion at Jammu bus-stand: Yasir Bhatt was tasked to throw this grenade by District Commander of Hizbul Mujahideen in Kulgam, Farooq Ahmed Bhatt alias Omar. https://t.co/wcBsug29Kp
— ANI (@ANI) March 7, 2019
यासीर भट असे त्या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून त्याने पोलीस चौकशीत त्याचा गुन्हा कबूल केला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा जिल्हा कमांडर फारुक अहमद भाट उर्फ ओमर याने यासीरला जम्मूच्या बस स्थानकावर ग्रेनेड फेकण्याचे काम दिले होते. त्याच्या सांगण्यानुसार यासीरने गुरुवारी सकाळी बस स्थानकावर ग्रेनेड फेकले. पोलिसांनी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच प्रत्यक्ष्य दर्शींनी दिलेल्या साक्षीनंतर यासीर भाटला ताब्यात घेण्यात आले. मात्र चौकशीदरम्याने यासीरने त्याचा गुन्हा कबूल केला.

या हल्ल्यात एका तरुणाचा मृ्त्यू झाला तर 29 जण जखमी झाले आहेत. मोहम्मद शारीक असे त्या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून ते उत्तराखंडचा रहिवासी होता. दरम्यान, ग्रेनेड हल्ल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती. यामध्ये 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप अनेक भागात शोध मोहीम देखील सुरू असून हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडर फारुक अहमद भाट उर्फ ओमरचा पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या महिन्यात पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला घडवला होता. त्या हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्याचे अड्डे उध्वस्त केले होते. हिंदुस्थानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. त्यामुळे हाय अॅलर्ट देण्यात आला होता. त्यानंतरही हा स्फोट झाल्याने पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.


























































