
सामना ऑनलाईन । ब्यूनोस आयर्स
अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानच्या मुलांच्या आणि मुलींच्या हॉकी संघांना रौप्यपदकाकर समाधान मानाके लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत पुरुष संघाला मलेशियाकडून हार पत्करावी लागली, तर महिला संघाला यजमान अर्जेंटिनाने हरविले. या दोन रौप्यपदकांमुळे हिंदुस्थानच्या खात्यात आता 3 सुवर्ण व 7 रौप्यपदकांसह 10 पदके जमा झाली आहेत.
हिंदुस्थानच्या पुरुष संघाला मलेशियाने 4-2 अशा गोल फरकाने हरविले. पूर्वार्धात 1-2ने पिछाडीवर पडलेल्या मलेशियन संघाने उत्तरार्धात बाजी पलटकली. अझीमुल्ला अनुअर याने 14क्या आणि 19क्या मिनिटाला तर अरिफ इशाकने 17क्या मिनिटाला गोल करून सनसनाटी किजय मिळकून दिला.
हिंदुस्थानच्या मुलींनाही सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जेंटिनाने 3-1 गोल फरकाने हरविले. यजमान अर्जेंटिनाकडून जिनेला पॅलेटने 7क्या, सोफिया रॅमॅलो 9क्या आणि ब्रिसा ब्रगसरने 12क्या मिनिटाला गोल केले.




























































