‘माझ्या स्कर्टमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला गेला’, सोफियाने सांगितली होळी पार्टीतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमधील ब्रिटीश मॉडल सोफिया हयात ही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. नेहमी चर्चेत असणारी सोफिया आता एका वेगळ्याच कारणावरून पुन्हा चर्चेत आली आहे.

देशभरात होळीचा सण साजरा होत असताना सोफियाने तिच्यासोबत होळी घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलं आहे. एका न्यूज पोर्टलशी बोलताना सोफियाने सांगितले की, ‘मी एका होळीच्या पार्टीत गेली होती. जिथे अनेक सेलिब्रिटीस आले होते. या पार्टीत मी खूप पाणीपुरी खाली. ज्यात कदाचित भांग मिसळली होती. ते खाल्यानंतर मला खूप आनंदी वाटत होत, नंतर मी सर्वांसोबत फोटो क्लिक करत होती.’

सोफियाने पुढे सांगितले, त्यात पार्टीत एका व्यक्तीने तिच्या स्कर्टमध्ये हात टाकण्याचा पर्यंत केला. पहिल्यादा असं केल्यास तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र दुसऱ्यांदा त्या व्यक्तीने हात टाकण्याचा पर्यंत केला असता सोफियाने त्याला जमनीवर पाडलं. या घटनेवर सोफियाने नाराजी जाहीर केली. मात्र त्यावेळी तिच्या एका मित्राने तिला मदत करत घरी सोडल्याचेही सोफियाने सांगितले आहे.