
> बऱ्याचदा मान नेमकी कशामुळे दुखते हे कळत नाही. असं काही झालं तर सर्वात आधी ज्या ठिकाणी मानेला सूज आहे, त्या ठिकाणी सूज कमी करण्यासाठी बर्फाचा पॅक सुती कपडय़ात गुंडाळून मानेवर 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर गरम पाण्याचा शेक द्या. गरम शॉवर घेतल्यासही थोडा आराम मिळतो.
> मानेला जास्त ताण देणाऱया हालचाली टाळाव्यात. बसताना किंवा झोपताना तुमची मान आणि पाठ सरळ राहील याची काळजी घ्या. तणाव कमी करणे आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. मान जास्त दुखत असेल तर डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांच्या सल्ल्याने मानेचे हलके स्ट्रेचिंग व्यायाम करा, ज्यामुळे स्नायू मोकळे होतील.


























































