समलैंगिक संबंधातूनही पसरू शकतो डेंग्यू? डॉक्टर पडले बुचकळ्यात

1330

डासांमुळे पसरणाऱ्या घातक आजारांपैकी एक म्हणजे डेंग्यू. एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासाच्या चावण्यामुळे हा आजार होऊ शकतो. रक्तपेशींवर आघात करणाऱ्या आजारात माणसाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हा आजार गंभीर आजारांपैकी एक मानला जातो.

स्पेनमध्ये मात्र एक विचित्र घटना उघड झाली आहे. येथील एका समलैंगिक जोडप्याने सेक्स केल्यामुळे त्यातील एका पुरुषाला झालेला डेंग्यू दुसऱ्याला झाल्याचा संशय डॉक्टरांना आहे. यातील एका पुरुषाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर आठवड्याभरात त्याच्या जोडीदारालाही डेंग्युची लक्षणं दिसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वास्तविक ते दोघंही क्युबा आणि डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये फिरून आले होते. त्यांना तिथेच लागण झालेली असती तर दोघेही एकाच वेळी आजारी पडले असते. मात्र, त्यातील एकाला आधी लागण झाल्याने डॉक्टरांना हा संसर्ग समलैंगिक संबंधांतून झाला असावा, असा संशय आहे.

मात्र, समलैंगिक संबंधांतून डेंग्यूची लागण होऊ शकते का, याबाबत अजूनही संभ्रम आहे. पण, स्त्री आणि पुरुष संबंधांतून डेंग्यूची लागण होऊ शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कारण, काही काळापूर्वी दक्षिण कोरियात एका जोडप्याला अशाच प्रकारे डेंग्युची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.

 

आपली प्रतिक्रिया द्या