
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बाजारात सध्या विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. अगदी सोने आणि हिरेजडीत मास्क देखील बाजारात बाजारात मिळतात. येत्या काही दिवसांत तुम्हाला कारवरही मास्क पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको..
कोरोनासह हवेतील व्हायरसपासून बचाव करण्यासाठी होंडा कंपनीने पुरूमाकू हा स्पेशल मास्क तयार केला आहे. या मास्कमुळे कारच्या केबिनमधील कोरोनासह इतर व्हायरचा 15 मिनिटांत 99.8 टक्के खात्मा होतो, असा दावा कंपनीने केला आहे.
कारच्या एअर फिल्टरवर पुरूमारू बसवावा लागतो. त्यासाठी खास एन बॉक्स तयार केले जाणार आहे. सध्याच्या कारच्या एअर फिल्टरसाठी पुरूमाकू फिट बसत नाही. मात्र भविष्यात इतर कारसाठी देखील पुरूमाकूचा वापर केला जाईल. दरवर्षी किंवा 15 हजार किमीनंतर पुरूमाकू बदलावे लागणार असून याची किंमत 4500 हजार रूपये इतकी आहे.





























































