‘हॅनी ट्रॅप’ मधील महिलेसह तिच्या साथीदाराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणातील महिला आणि तिला मदत करणारा आरोपी गणेश छगन गिर्हे (रा. राघुहिवरे, ता. पाथर्डी) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. राहाता तालुक्यातील लोणी येथून त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना शनिवारपर्यंत (दि. 24) पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. महिलेचा पती फरार आहे.

पाथर्डी तालुक्यातील 42 वर्षीय इसमाला ‘पेंटिंगचे मोठे काम देते,’ असे सांगून संबंधित महिलेने नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे तिच्या घरी बोलावून घेतले होते. मोठे काम मिळणार असल्याने ते संबंधित महिलेच्या घरी गेले असता, तिने जवळीक साधत त्यांच्यासोबत फोटो काढून पैशांसाठी धमक्या दिल्या जात होत्या.