मधुचंद्र : प्रेमाची देवाणघेवाण

586

प्राजक्ता हनमघर- रजत धळे बुलेटवरून श्रीलंका… गजराजांचा आशीर्वाद आणि एकमेकांची साथ.

– मधुचंद्र म्हणजे ः आम्ही सतत फिरतच असतो. माझ्यासाठी मधुचंद्र म्हणजे आम्ही दोघं एकत्र असणं.
– फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले ः रजत एका बुलेट ग्रुपला जॉईन आहे, त्यामुळे आमचं असं ठरलं होत की जिथे जाऊ तिथे बुलेटवरुन फिरता आलं पाहिजे. श्रीलंका आम्हाला त्यासाठी चांगला पर्याय वाटला. त्यामुळे श्रीलंकेला जायचे ठरले.
– आवडलेले ठिकाण ः तिथली सगळीच ठिकाणं आवडली. पण श्रीलंकेला आम्ही बुलेटवरुन फिरलो. तो माझ्यासाठी वेगळा अनुभव होता.
– ठिकाणाचे वर्णन – तिथलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे. मजा आली तिथे फिरायला. आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी पाऊस होता, ऊन होतं, काही ठिकाणी थंडी होती. त्यामुळे मला एकावेळी तिन्ही ऋतूंचा अनुभव घेता आला.
– मधुचंद्रासाठी शॉपिंग ः हो. मी तिथून खूप मसाले घेऊन आले होते. तिथे स्पाईस गार्डनमध्ये गेले होते. तिथून मी खूपं मसाले घेऊन आले होते. ते अजून दोन वर्षे झाले तरी संपलेले नाहीत.
– काही खास क्षण ः तिथे मी केलेली हत्तीवरची राईड. तो अनुभव मी कधीच विसरु शकत नाही. हत्तीवर बसून आम्ही पूर्ण गार्डन फिरलो होतो. ते हत्ती फार मनोरंजक असतात. त्यांना प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे ते छान असतात. उतरल्यावर सोंडेने आशिर्वाद दिला. त्यांना खाऊ घातले. त्यांच्यासोबत फोटोसेशन केलं. मजा केली.
– मधुचंद्र हवाच की… ः माझं म्हणणं आहे की तुमच्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असेल, आपुलकी, ओढ, आदर या गोष्टी असतील तर तुम्ही जिथे आहात तिथे मधुचंद्र साजरा करु शकता.
– एकमेकांशी नव्याने ओळख ः आपण जेव्हा जोडीदारासोबत फिरायला जातो तेव्हा नक्कीच ओळख होते. कोणाबरोबरही फिरायला गेल्यावर मला वाटतं तो माणूस आपल्याला जास्त कळतो. प्रवासात तो कसा आहे, तो समजूतदार आहे, तो खाण्याच्या बाबतीत काळजी कशी घेतो, तो तुमची कशी काळजी घेतोय, फिरण्याच्या बाबतीत कशी साथ देतो हे आपल्याला फिरताना कळतं. मला वाटतं आम्ही फिरण्यासाठी बेस्ट बडी आहोत.
z किती दिवस द्यावेत… ः हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. काही व्यक्ती चटकन कळतात म्हणजे तुम्हाला भेटल्यावरच वाटत आपली किती आधीपासूनची ओळख आहे आणि काही व्यक्ती कळायला फार वेळ लागतो. नात्यात प्रेम थोडं कमी असलं तरी चालेल पण समजूतदारपणा हवाच. गरज पडेल तेव्हा एकमेकांना स्पेस देणं. या गोष्टी असतील तर सोबत सुखद होऊ शकते.
– तिथला आवडलेला खाद्यपदार्थ ः कॅरेमल कस्टर्ड, केळ्याचे वेफर.
– अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम ः रोमॅन्टिसिझम. तोच गरजेचा आहे. प्रेम खूप असेल तर ठिकाण मॅटर करत नाही. मग महाबळेश्वरला गेल्यावरसुद्धा मी तितकीच खूश असते जितकी हाँगकाँगला गेल्यावर.
– जोडीदाराची खास आठवण? ःआम्हाला दोघांनाही फिरायला खूप आवडतं. माझी शॉपिंगच्या आवडीची तो पूर्णपणे काळजी घेतो. उत्साहाने माझ्यासोबत शॉपिंग करतो आणि तेवढय़ाच वेळेत मला सरप्राईज पण देतो माझ्या नकळत. असं प्रत्येक ठिकाणी करतो. तिथले जे जे विशेष आहे ते माझ्यासाठी करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि ते फार वेलप्लॅन्ड असतं. मला चहा प्रचंड आवडतो. त्यामुळे कुठेही गेलो की आधी तो चहा मागवतो. श्रीलंकेतून आम्ही इतकी चहा पावडर आणली होती की आमची विमानतळावर चेकिंग झाली कसली पावडर आणली म्हणून. माझ्या आवडी-निवडिची काळजी घेतो.
-एकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू ःआम्ही सतत एकमेकांना भेटवस्तू देत असतो. तिथे आम्ही एकमेकांसाठी एकसारखे टी-शर्ट घेतले होते.
– मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार ः फार भारी आहे. खूप समजूतदार, प्रेमळ आहे. रोजच्या आयुष्यात पण तो तितकाच प्रेमळ आहे जितका तो बाहेर असतो. मला स्पेस देतो. जसं की मला वाचताना एकांत लागतो तसं माझा माझा वेळ मला तो देतो. माझ्या आवडीनिवडी सांभाळतो. कामं करतानाही त्याची मदत असते. तो पोहे खूप छान बनवतो, मला असं वाटतं की मी माझ्या मित्रासोबत राहते. इतकं आमचं एकमेकांसोबत चांगलं बॉण्ंिडग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या