राशिभविष्य – रविवार 17 मार्च ते शनिवार 23 मार्च 2024

>>नीलिमा प्रधान

मेष – नवीन परिचय प्रेरणादायी

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, शुक्र शनि युती. क्षेत्र कोणतेही असो कायद्याला धरून कृती करा. नोकरीत वरिष्ठ अडचणीत आणतील. नम्रता ठेवा. मित्र, सहकारी मदत करतील. धंद्यात कराराची घाई नको. नवीन परिचय प्रेरणादायी ठरतील. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. आरोप होतील. चर्चेत सावध रहा.
शुभ दिनांक ः 18, 23

वृषभ – मेहनत उपयुक्त ठरेल

सूर्य, नेपच्युन युती. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाचा प्रत्येक दिवस उत्साह, यश देणारा ठरेल. महत्त्वाची किचकट कामे करून घ्या. नोकरीधंद्यात लाभ, सुधारणा होईल. वरिष्ठांचे मन जिंकता येईल. मेहनत उपयुक्त ठरेल. वसुली करा. कर्जाच्या कामाला गती मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना पुढे नेता येईल. वरिष्ठांच्या मनातील राग दूर होईल.
शुभ दिनांक ः 18, 19

मिथुन – कामाची प्रशंसा होईल

सूर्य, नेपच्युन युती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. अडचणीत आलेली कामे करा. भेट, चर्चेत यश मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल घडेल. कामाची प्रशंसा होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंद्यात जम बसवा. वसुली करा. नवा करार शक्य. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध कराल. लोकप्रियता वाढेल. विरोधकांना शह देता येईल.
शुभ दिनांक ः 19, 21

कर्क – प्रकृतीची काळजी घ्या

सूर्य, नेपच्युन युती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. सुरळीत चाललेल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न जवळच्या व्यक्ती करतील. मैत्रीत, नात्यात तणाव, वाद, चिंता होतील. स्वतच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात नम्र रहा. बदल करण्याची घाई नको. भागीदार त्रस्त करेल. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व वाढेल.
शुभ दिनांक ः 21, 23

सिंह – प्रवासात सावध रहा

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, शुक्र, शनि युती. कोणत्याही व्यक्तीवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवू नका. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत सहनशीलता ठेवा. धंद्यात उत्साह, आत्मविश्वास वाढेल. परंतु कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी येतील. अपमान करण्याचा प्रयत्न होईल.
शुभ दिनांक ः 17, 18

कन्या – मैत्रीत दुरावा येईल

सूर्य, नेपच्युन युती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. मैत्रीत, नात्यात दुरावा येईल. गैरसमज उद्भवतील. महत्त्वाच्या वस्तू जपा. प्रकृतीची काळजी घ्या. कोणालाही कमी लेखू नका. नोकरीत बुद्धीची चमक दिसेल. चांगले आश्वासन मिळेल. धंद्यात चूक नको. उधारी नको. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांसाठी काम करावे लागेल.
शुभ दिनांक ः 18, 19

तूळ – आत्मविश्वास वाढेल

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, शुक्र, शनि युती. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. भावनेच्या आहारी न जाता कृती वर भर द्या. नोकरीच्या कामात सावध रहा. जवळच्या व्यक्ती स्पर्धा करतील. धंद्यात लाभ होईल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न होईल. आरोप होतील. स्पर्धा जिद्दीची ठरेल.
शुभ दिनांक ः 18, 19

वृश्चिक – फसगत टाळा

सूर्य, नेपच्युन युती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. व्यवहारिक दृष्टिकोन स्पष्ट ठेवा. स्वतच्याच मनाला रुचेल असा fिहशेब चुकीचा ठरेल. नोकरीत स्पर्धा करणारे वाढतील. धंद्यात फसगत टाळा. उधार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा. बुद्धिचातुर्य उपयुक्त ठरेल. वाहन जपून चालवा.
शुभ दिनांक ः 20, 23

धनु – अहंकार दूर ठेवा

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग. कोणतीही समस्या चातुर्याने सोडवा. अहंकार, मोठेपणा उपयुक्त ठरणार नाही. प्रेमाने, मैत्रीच्या नात्याने प्रश्न सोडवा. नोकरीत क्षुल्लक तणाव जाणवेल. धंद्यात लाभ, कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्य करताना ध्येयावर लक्ष ठेवा. प्रतिक्रिया देण्याची घाई नको. सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक ः 17, 18

मकर – नोकरीत वर्चस्व वाढेल

सूर्य, नेपच्युन युती, चुद्र, बुध त्रिकोणयोग. स्वतच्या कामावर लक्ष द्या. वेळेला महत्त्व द्या. सहकारी, मित्र सहाय्य करतील. नोकरीत वर्चस्व, व्याप वाढेल. धंद्यात वाढ होईल. अहंकाराने बोलू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाची योग्य मांडणी करा. राग वाढू देऊ नका. स्पर्धेत पुढे जाणे सोपे नाही. डोळ्यांची काळजी घ्या.
शुभ दिनांक ः 20, 21

कुंभ – कार्याला नवे वळण मिळेल

सूर्य, नेपच्युन युती, चंद्र, गुरू लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर तणाव जाणवेल. तुमचा अंदाज चुकेल. नोकरीत प्रगती होईल. बदल घडेल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याला नवे वळण देऊन वेगाने योजना ठरवा. लोकसंग्रहाचा विस्तार करा. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. कठीण कामे रेंगाळत ठेवू नका.
शुभ दिनांक ः 17, 18

मीन – वरिष्ठांना सहकार्य करा

सूर्य, प्लुटो लाभयोग, शुक्र, शनि युती. फायदेशीर वाटणाऱया योजना फसव्या ठरतील. परिचय तपासून नंतरच व्यवहार करा. नोकरीत वरिष्ठांना सहकार्य करावे लागेल. मित्र, नातलग यांच्यात गैरसमज, दुरावा येईल. आरोग्याची काळजी घ्या. धंद्यात खर्च होईल. नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठेपणा मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिनांक ः 20, 21