भविष्य – रविवार १२ ते शनिवार १८ नोव्हेंबर २०१७

117

>> नीलिमा प्रधान

मेष – कलाक्षेत्रात प्रगतीची संधी
व्यवसायात वादग्रस्त स्थिती निर्माण होईल. समस्या सोडवता येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तुम्हाला धैर्याने विरोधकांना सामोरे जावे लागेल. काही प्रश्न तुमच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न समोरची व्यक्ती करील. नवे डावपेच तयार करून ठेवा. कोर्टकेसमध्ये समतोल राखा. कलाक्षेत्रात संधी मिळेल.

शुभ दिन – १२, १६

वृषभ – नोकरीत यश मिळेल
नोकरीचा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न चिघळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव कमी करण्याचा डाव खेळला जाईल. संयम, सहनशीलता ठेवा. कोर्ट केसमध्ये सल्ला घ्या. भावनाविवशता अपयशास कारणीभूत ठरेल अनाठायी खर्च होईल.

शुभ दिन – १४, १८

मिथुन – कामाचा व्याप वाढेल
महत्त्वाची कामे या आठवडय़ात होतील. त्यानुसार सुरुवातीलाच प्रयत्न करा. तुमच्या मनमिळाऊ स्वभावाने मैत्री वाढेल. नोकरीत कामाचा व्याप वाढू शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजना वेळीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. कलाक्षेत्रात कौतुक होईल. व्यवसायात वाद होतील.

शुभ दिन – १२, १३

कर्क- मोठे कंत्राट मिळेल
या आठवडय़ात अत्यंत महत्त्वाची कामे करून घ्या. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. नवीन परिचयाचा सामाजिक कार्यात व व्यवसायात त्याचा फायदा होईल. राजकीय क्षेत्रात गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. नाटय़-चित्रपट क्षेत्रांत तुमचा प्रभाव वाढेल.

शुभ दिन – १४, १८

सिंह – मनोबल राखा
सहकारी व मित्र यांची साथ मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्याविरोधात धाडस केले जाईल. तुमचे चातुर्याचे बोल तुमच्याच माथी मारण्याचा प्रयत्न होईल. तटस्थ राहून प्रसंगानुरूप उत्तर द्या. व्यवसायात अचानक खर्च वाढेल. नाटय़ व चित्रपटक्षेत्रात नवे परिचय होतील.

शुभ दिन – १३, १४

कन्या – व्यवसायात चांगला बदल घडेल
मनावरील दडपण कमी होईल. व्यवसायात चांगला बदल करता येईल. भागीदार व गुंतवणूकदार मिळतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेण्याचे वरिष्ठ ठरवतील. कोर्ट केसमध्ये योग्य सल्ला घेता येईल. कौटुंबिक समस्या कमी होतील. तुम्ही योजना मार्गी लावा. स्वतःचे कार्य चालूच ठेवा.

शुभ दिन – १७, १८

तूळ – शेअर्समध्ये फायदा होईल
कुटुंबात तुमच्या प्रेमळ स्वभावाचा उपयोग करून घेतला जाईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा विस्तार करा. धंद्याला चांगली कलाटणी मिळेल. नव्या पद्धतीने अंदाज बांधावे लागतील. शेअर्समध्ये फायदा होईल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. नवीन खरेदी होईल. कला क्षेत्रात काम मिळेल.

शुभ दिन – १७, १८

वृश्चिक – संयम बाळगा
आर्थिक गुंतवणूक करण्याची घाई नको. शेअर्समध्ये अस्थिरता राहील. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात धाडसी निश्चित निर्णय घेणे धोकादायक ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडतील. अतिविश्वास व अहंकारामुळे प्रतिष्ठा धोक्यात येईल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.

शुभ दिन – १४, १८

धनु – अडचणींवर मात करा!
अडचणींवर जिद्दीने व आत्मविश्वासाने मात करता येईल. व्यवसायात मात्र लक्ष द्या. वादावादी व कामगारवर्गाकडून नुकसान संभवते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमच्या कार्यात चुका काढतील. तुम्ही सावध राहिल्यास प्रश्न वाढणार नाहीत. नाटय़, चित्रपटात तुमचे विचार सर्वांनाच आवडतील असे नाही.

शुभ दिन – १४, १५

मकर – प्रतिष्ठा वाढेल
तुमच्या कार्याला गती मिळेल. लोकांचे प्रेम व सहकार्य सामाजिक क्षेत्रात मिळेल. तुमच्याशी मैत्री करणाऱयांना प्रतिष्ठsने व प्रेमाने जवळ करा. दुसऱयांचे मुद्दे समजून घ्या. कोर्ट केससंबंधी निर्णय तुमच्या बाजूने लागेल. प्रयत्न करा. प्रतिष्ठा वाढेल. नाटय़, चित्रपटात तुमच्या कलागुणांचा विकास होईल. प्रसिद्धी मिळेल.

शुभ दिन – १४, १५

कुंभ – आर्थिक लाभ मिळेल
मंगळवार, बुधवारी संतापजनक घटना घडेल. मनाविरुद्ध एखादा निर्णय घ्यावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा व्यापक दृष्टिकोन प्रभावी ठरेल. व्यवसायाचा व्याप वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कुटुंबात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. कलाक्षेत्रात आर्थिक लाभ होईल.

शुभ दिन – १२,१६

मीन – नम्रता बाळगा
नकार मिळालेले काम अचानक होण्याची शक्यता आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. जमिनीसंबंधी कामे होतील. राजकीय, सामाजिक कार्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. व्यापक दृष्टिकोन व नम्रता बाळगा. नाटय़, चित्रपटात संधी हुकण्याची शक्यता आहे.

शुभ दिन – १४, १८

आपली प्रतिक्रिया द्या