भयंकर ! महिलेच्या कानात घुसला साप, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दरदिवशी वेगेवगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहीदा लोटपोट हसवणारे व्हिडीओ असतात तर काहीवेळा थक्क करणारे व्हिडीओ असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका तरुणीच्या कानात चक्क लहान साप घुसल्याचा व्हिडजीओ सध्या चर्चेत आला आहे. विश्वास बसणार नाही पण हे खरंय. जेव्हा तिला कानात साप गेल्याचे कळले तेव्हा तिने थेट दवाखाना गाठला. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी दवाखान्यात पोहोचली. तिने जेव्हा डॉक्टरांना कान दाखवला तेव्हा तेही घाबरले असतील. व्हिडीओमध्ये डॉक्टर तरुणीला बसवून तिच्या कानातून साप काळजीपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. डॉक्टरने आपल्या हातात ग्लोव्ज घातले असून लहान चिमट्याने त्या सापाला अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा साप पिवळ्या रंगाचा दिसत असून त्यावर काळे पट्टे दिसत आहेत. मात्र ही घटना नेमकी कुठली आहे याची माहिती मिळालेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Roy (@shilparoy9933)

सोशल मीडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ती तरुणी शांत बसलेली आहे आणि डॉक्टर तो साप बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. फेसबुकवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पटनाला राहणाऱ्या चंदन कुमारने शेअर केलेला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला फोटोओळ दिलेली आहे त्यामध्ये कानामध्ये साप गेला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 41 हजार लोकांनी लाईक्स केले आहे. ज्यामध्ये 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे की, हा सापाला बाहेर काढत आहे की पुन्हा आत घालत आहे. तर दुसऱ्या युजरने लिहीलेय, एक अन्यने लिहीलेय, मुलगी जंगलात झोपली होती का?