निवासी हॉटेल्स, लॉज उद्यापासून उघडणार; 33 टक्के ग्राहकांनाच राहण्याची संमती

555
five-star-hotel-room

कोरोना लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागात हॉटेल्स आणि लॉज 8 जुलैपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. निवासाची व्यवस्था असलेलीच हॉटेल्सच सुरू करता येतील. यामध्ये फक्त 33 टक्के ग्राहकांनाच राहण्याची संमती असेल.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे ग्राहकांना पूर्वीसारखे मनमोकळे वावरता येणार नाही. तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीनुसार फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे लागेल. कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत त्यांनाच हॉटेल, लॉजमध्ये प्रवेशास परवानगी असेल. हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल आणि जिम बंद राहणार असे यासंदर्भातील नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस क्वारंटाईन सेंटर केली गेली असतील तर ती पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. तसेच 33 टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली 67 टक्के क्षमता ही क्वारंटाईनसाठी वापरण्याचे अधिकार हे सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.

साफसफाई व अन्य बाबींची दक्षता

 • हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या ग्राहकानं स्वतःची मेडिकल हिस्ट्री व ट्रॅव्हल हिस्ट्री याची माहिती देणं बंधनकारक
 • हॉटेलमधील वॉशरूम स्वच्छ ठेवण्यात यावे
 • हॉटेलमधील तापमान संतुलित ठेवण्यासाठी एसी 24 ते 30 डिग्रीमध्ये ठेवावा. त्याचबरोबर 40 ते 70 आर्द्रता राहील याची काळजी घ्यावी
 • दरवाजाची कडी, लिफ्ट बटण यासारख्या जास्त स्पर्श होणार्‍या वस्तूंना 1 टक्के सेझियम हायपोक्लोराइटद्वारे साफ करावे
 • हॉटेल्समधील रूम खाली झाल्यावर सॅनिटरायझेशन करावे, तसेच वेळोवेळी साफसफाई करावी
 • हरा कव्हर्स, मास्क किंवा संरक्षणासाठी वापरल्या जाणार्‍या गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था असावी

हॉटेल्स, लॉजमध्ये या गोष्टींची व्यवस्था हवी

 • कोरोनापासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक, पोस्टर, एव्ही मीडिया दर्शनी भागात लावावेत
 • हॉटेलच्या प्रवेशावर हँड सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी
 • हॉटेल आणि पार्पिंगमध्ये होणार्‍या गर्दीचे योग्य नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्तुळे आखावीत.
 • प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक, रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास आवश्यक
 • फेस मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज् या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक या दोघांसाठी उपलब्ध करावीत
 • पेडल ऑपरेटेड हँड सॅनिटायझर मशीन रिसेप्शन, गेस्ट रूम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत. चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेटचा वापर करावा
 • कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश
 • हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक
 • प्रवाशांचे तपशील, प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती आणि ओळखपत्र रिसेप्शनवर देणे बंधनकारक
 • आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक
 • हाऊसकीपिंग सुविधा कमीत कमी वापरण्यात यावी.
आपली प्रतिक्रिया द्या