संगमनेर तालुक्यात हॉटस्पॉट पॉकेटमध्ये 22 मेपर्यंत निर्बंध

324

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सात करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथ रोग अधिनियम 1897 अनन्वे अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार संगमनेर शहरातील हॉटस्पॉट पॉकेट जाहीर केले आहेत. या भागात 22 मेपर्यंत निर्बंध राहणार आहेत.

संगमनेरमधील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, कुरण (संगमनेर तालुका), मौजे धांदरफळ, संगमनेर तालुका हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर झाले आहेत. या क्षेत्रापासून दोन किलोमीटरचा परिसर कोर एरिया घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री 9 मे ते 22 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या भागात येण्यास आणि बाहेर जाण्यास मनाई करण्यात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या