‘होऊ द्या चर्चा’ला बोरिवली, दहिसरमध्ये प्रचंड प्रतिसाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 5,  दहिसरच्या वतीने अशोक वन येथे ‘होऊ द्या चर्चा’ हे अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी, विभाग संघटक भास्कर खुरसंगे, माजी नगरसेवक संजय घाडी, उपविभागप्रमुख सचिन शिर्के, महिला विधानसभा संघटक अनिता डहाळे, महिला विधानसभा समन्वयक तन्वी मासये, शाखाप्रमुख संदीप शेलार, पूजा गावडे, घनश्याम सोंडकर, मोहम्मद सय्यद, शाखा समन्वयक मनीष प्रभू, रामचंद्र नायक, दिलीप परब, प्रदीप नेगी, तानाजी जाधव, प्रवीणा रेवाळे उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक 13 च्या वतीने बोरिवली पूर्व येथे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उपविभागप्रमुख भास्कर खुरसंगे, अशोक सोनावणे, विधानसभा समन्वयक स्नेहल पाताडे, शाखाप्रमुख उत्तम बारबोले, शाखा समन्वयक सुप्रिया मोरे, संतोष तांदळगावकर, युवासेना सचिव श्रीकांत ढोबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.