वाघोली येथे लागलेल्या आगीमध्ये घर जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील वाघोली येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून घर जळून खाक झाले आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

वाघोली येथील रहिवासी विष्णू सोपान जाधव यांच्या घराला दुपारी ४ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये घरातील सर्व जीवनउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घरामधील ज्वारी, गहू, डाळ, तांदूळ, शालेय साहित्य, मोलमजुरी करून जमा केलेले थोडेफार पैसे तसेच अनेक मोल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या कुटुंबास तीन एक्कर कोरडवाहू जमीन असून चार जणांचे कुटुंब आहे. घरातील सर्व वस्तू जळून गेल्याने या कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. शेतातून दुष्काळ परिस्थितीमुळे कसलेही उत्पादन मिळाले नाही. पण आता घर जळाल्याने संसार उघड्यावर आला आहे. जाधव यांच्या कुटुंबात पत्नी वर्षा विष्णू जाधव व दोन मुले असून एक मुलगा अण्णासाहेब व एक मुलगी निकिता असा चार जणांचा परिवार आहे.