हाऊसफुल-5 दोनशे कोटींच्या क्लबमध्ये

अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि अक्षय पुमारचा काॅमेडी चित्रपट हाऊसफुल-5 ने वर्ल्डवाईड 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने देशभरात 9 दिवसात 174 कोटी कमावले असून जगभरात 212.76 कोटी रुपये कमावले आहेत, अशी माहिती चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला 28.73 कोटींची ओपनिंग मिळाली होती. तर आठव्या दिवशी या चित्रपटाने 7.78 कोटी रुपये कमावले आहेत. हाऊसफुल-5 साठी 240 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.