हाऊसफुल्ल कालिदास….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठी माणूस आणि नाटक यांचं नातं अजोड आहे.मुलुंड च्या कालिदास नाटयगृहात याची पुन्हा प्रचिती आली . अखिल भारतीय नाटय संमेलनाच्या निमित्ताने या नाटयगृहात मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातून नाटयप्रेमी आले आहेत.संगीत सौभद्र नाटकपासून ते लावणी, गायन ,चर्चा आदी अनेक कार्यक्रम दोन दिवस झाले .या सर्व कार्यक्रमांना हाऊसफुल गर्दी झाली . विशेष म्हणजे तरुण रसिकापासून ते अगदी ८० वर्षाच्या वृद्धांपर्यंत नाटयप्रेमीचा जणू कुंभमेळा भरला आहे .नाटयगृहाची बाल्कनीही गर्दीने फुलून गेली होती .