
सहकारी हौसिंग सोसायटय़ांचे पदाधिकारी मनमानी करत प्रत्येक महिन्याला सभासदांच्या माथी अवाच्या सवा मेंटेनन्स मारतात. त्यांच्या या लुटमारीला आता चाप बसणार आहे. एखाद्या संस्थेकडून जादा मेंटेनन्स आकारला जात असल्याची तक्रार सभासदाने केल्यास निबंधकाने त्याची शहानिशा करून वाढीव वसूल रक्कम संबंधितांना परत करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत. त्याच वेळी मासिक मेंटेनन्स न भरणाऱया सभासदांवर कारवाई करावी, असेही स्पष्ट केले आहे.



























































