
केसांची निगा राखताना त्यांची योग्य पद्धतीने देखरेख करणेही तितकेच गरजेचे आहे. बाजारात उपलब्ध असलेले केसांसाठीचे शॅम्पू आपल्याला आढळतात. परंतु हे शॅम्पू किती वेळा लावायला हवेत यालाही तितकेच महत्त्व आहे. केसांना आठवड्यातून किती वेळा शॅम्पू लावावा हे केसांच्या प्रकारावर आणि आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे.
तेलकट केसांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा शॅम्पूने धुवावेत. जास्त घाम येत असेल किंवा रोज बाहेर जावे लागत असल्यास, तीन वेळा केसांना शॅम्पू लावणे उत्तम.
कोरडे केस असल्यास, आठवड्यातून फक्त एक ते दोन वेळा शॅम्पू करणे हितावह आहे. अधिक शॅम्पू केल्यास, केस अधिक कोरडे आणि नाजूक होऊ शकतात.
कोंडा असल्यास डॉक्टरांनी सुचवलेला अँटी-डॅन्ड्रफ शॅम्पू आठवड्यातून २–३ वेळा वापरावा.
केसांना शॅम्पू लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
शॅम्पू करण्यापूर्वी हलके तेल लावल्यास केस मऊ राहतात.
खूप गरम पाणी वापरू नका.
शॅम्पूनंतर कंडिशनर वापरल्यास केस मऊ मुलायम होतात.
























































