
सामना ऑनलाईन, मुंबई
मोबाईल चोरांचा सध्या सुळसुळाट झाल आहे. चोर नवनवीन शक्कल लढवून कसे मोबाईल चोरतील याचा नेम नाही. नुकतंच मोबाईल चोरताना एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एका बाजारात एक ग्राहक भाजी विकत घेत असून चोर आणि त्याचा लहानगा साथी त्या ग्राहकाचा मोबाईल चोरत आहेत. पिशवीचा आधार घेऊन ही चोरी करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
ही घटना सोलापूरच्या कुर्डुवाडीतल्या आठवडा बाजारातील असल्याचे बोललं जात आहे.सीसीटीव्हीत ही घटना कैद होत असताना पोलिसांना ते कळाले आणि वेळीच त्यांनी या चोराला धरले.


























































