आवळा नवमी कशी साजरी करतात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार्तिक महीन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला भगवान विष्णूची पूजा करणे शुभ मानले जाते. ह्यावर्षी 5 नोव्हेंबरला नवमी येत आहे. आणि या तिथीला आवळा नवमी असेही म्हणतात. हिंदू धर्मात आवळा नवमीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला आवळ्याचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे. म्हणूनच हा दिवस आवळा नवमी म्हणून साजरा केला जातो असे सांगितले जाते. हिंदू धर्मानुसार आवळा नवमीला आवळ्याची पूजा केल्याने ब्रम्हा, विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्याला आशर्वाद देतात असे सांगितले जाते. असे मानतात कि या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्यास व त्याच्या चरणी आवळा अर्पण केल्यास लाभ होतो. आवळा नवमीला आवळ्याची पूजाही केली जाते. ही पूजा कशी केली जाते ते जाणून घेऊयात

आवळा नवमी ची पूजा करण्याची पद्धत..

आवळा नवमीला स्त्रियांनी सकाळी लवकर उठून , अंघोळ करुन आवळ्याच्या झाडाजवळची जागा स्वच्छ करुन घ्यावी , जेणेकरुन पूजेचे स्थान स्वच्छ होईल.

आवळा नवमीची पूजा करण्यासाठी स्त्रियांनी आवळ्याच्या झाडाखाली उभे रहावे व पूर्व दिशेला मुख करुन पाणी व दूध अर्पण करावे.

जेव्हा ही पूजा पूर्ण होइल तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालून झाडाला धागा बांधावा. आवळ्याच्या झाडाची आरती करून घ्यावी. आरती झाल्यावर आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सुख आणि समृद्धीसाठी भगवान विष्णूकडे प्रार्थना करावी.