तुमचं Facebook Profile कोण करत आहे चेक, हे जाणून घेणं आहे का शक्य? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुकचा वापर जगभरात मोठ्या संख्येने लोक करतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपण आपले मित्र, कुटुंब आणि इतर युजर्सशी कनेक्ट राहू शकतो. मात्र बरेच लोक त्यांच्या फेसबुक प्रोफाइलला कोण भेट देतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही अशी युक्ती शोधत असाल तर त्यामागील सत्य जाणून घ्या.

इंटरनेटवर तुम्हाला अनेक प्रकारचे लेख सापडतील ज्यामध्ये फेसबुकवर तुमचे प्रोफाइल कोणी पाहिले हे जाणून घेण्याच्या ट्रिक सांगितल्या जातात. या ट्रिकचा वापर बरेच लोक करतात ही. यामध्ये तुम्हाला Facebook Desktop शी संबंधित अनेक लेख मिळतात. ज्यामध्ये तुम्हाला प्रथम ब्राउझरमध्ये फेसबुक लॉगिन करावे लागेल, असे सांगण्यात येते. यानंतर तुम्हाला पेजवर राईट क्लिक करावे लागेल आणि पेज सोर्स पाहण्यासाठी जावे लागेल. तुम्ही यासाठी CTRL + U हा शॉर्टकट देखील वापरू शकता. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज सोर्स उघडेल. या पेज सोर्सवर तुम्हाला CTRL + F दाबावे लागेल आणि BUDDY_ID शोधावे लागेल.

BUDDY_ID शोधल्यानंतर तुम्हाला काही लोकांचे आयडी दिसेल. जर तुम्ही हे 15 अंकी आयडी facebook.com/ असे लिहून उघडले, तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला कोणी भेट दिली हे कळेल. मात्र ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. कारण फेसबुकने स्पष्टपणे सांगितले आहे की, तुमच्या प्रोफाईलला कोणी भेट दिली, हे तुम्हाला कधीच कळू शकत नाही.

याबाबत माहिती देताना फेसबुकने म्हटले आहे की, ‘फेसबुक कोणालाही त्यांचा प्रोफाइल कोणी पाहिला आहे, हे कधीही सांगत नाही. तसेच कोणतेही थर्ड पार्टी अॅप्स देखील हे करू शकत नाहीत. अशी माहिती देणारे लेख किंवा अॅप तुम्हाला सापडल्यास त्याची रिपोर्ट करा, असं आवाहन फेबूकने केलं आहे.