
पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे सदस्य लॉगिन करून ईपीएफओचा फॉर्म-31 भरावा लागतो.
युनिफाइड पोर्टलमुळे EPF फॉर्म 31 द्वारे विड्रॉलसाठी अर्ज करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लॉगिन करा.
ऑनलाइन सेवा, दावे (फॉर्म 31, 19, 10 C) वर जा. तुमची केवायसी, आधार, पॅन आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करा.
ड्रॉपडाऊनमधून फॉर्म 31 निवडा, पैसे काढण्याचे कारण, पत्ता, रक्कम नमूद करा. गरज असल्यास कागदपत्रे अपलोड करा आणि तुमची विनंती सबमिट करा.
५ ते १५ कामकाजाच्या दिवसांत मंजूर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. EPFO पोर्टल किंवा UMANG ॲप वर तुमच्या क्लेमचे स्टेटस पाहू शकता.


























































