सर्वोत्तम मुदत विमा खरेदी करताना…

घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मुदत विम्यामुळे (टर्म इन्शुरन्स) त्याच्या कुटुंबाना संरक्षण मिळते. ही योजना शुद्ध संरक्षण प्रदान करते आणि त्यात कोणतीही बचत नसते. मुदत विम्याचा एक महत्त्वाचा लाभ असा आहे की, तुलनेने कमी प्रीमियमच्या बदल्यात कुटुंबाला जास्त जोखीम संरक्षण मिळू शकते. याबाबत श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंंपनीचे एमडी आणि सीईओ कॅस्परस क्रोमहौट यांनी केलेले मार्गदर्शन…

मुदत विमा घेताना या प्रमुख घटकांचा विचार करावाः

विमा रक्कमः विमा रक्कम मुदत पॉलिसीचा प्रमुख लाभ आहे. ते विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामांकित व्यक्तीला दिली जाणारी संरक्षण रक्कम किंवा एकरकमी पे-आउट असते.
संरक्षणाची मुदतः संरक्षणाची मुदत किंवा पॉलिसीची मुदत हा तो कालावधी असतो ज्यासाठी जीवन संरक्षण चालू राहील. हा पॉलिसीसाठी नियमित प्रीमियम भरण्यास आवश्यक असणारा कालावधीदेखील आहे.
परवडणारे प्रीमियमः विमाधारकाचे वय, घेतलेली विमा रक्कम आणि मुदत यावर प्रीमियर असते. प्रीमियम्स या घटकांवर आधारित असल्यामुळे ते लक्षणीयरीत्या बदलू शकतात. एखाद्या व्यक्तीचे सध्या आरोग्य कसे आहे याचादेखील प्रीमियम रकमेवर परिणाम होऊ शकतो.
अंडररायटिंगः मुदत विमा योजनेसाठी अर्ज करताना एखाद्याच्या आरोग्याविषयी प्रामाणिक असणे देखील महत्त्वाचे आहे. आवश्यक असल्यास त्यांनी वैद्यकीय तपासणी केली पाहिजे आणि आपला वैद्यकीय इतिहास उघड केला पाहिजे. उदाहरणार्थ, धुम्रपान, मद्यपान, याबाबत हे लागू होते.
विमा पंपनीचे क्लेम सेटलमेंट गुणोत्तरः उच्च क्लेम सेटलमेंट गुणोत्तर असलेली विमा कंपनी निवडा
रायडर्स आणि अतिरिक्त लाभः ग्राहक त्यांच्या मुदत विमा पॉलिसीचे ऑफर्स वाढवणारे अॅड-ऑन रायडर्स किंवा अतिरिक्त लाभ निवडू शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या काही रायडर्समध्ये गंभीर आजार, अपघाती मृत्यू आणि अपंगत्व असलेल्या रायडर्सचा समावेश आहे.