रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा काढा घरी कसा बनवाल ?

सर्दी, खोकला, ताप अशा व्हायरस आजारांपासून रक्षण करण्याकरिता रोगप्रतिकारक्षमता उत्तम असणे आवश्यक आहे. याकरिता घरी सहज उपलब्ध होणाऱे काही मसाल्याचे पदार्थ आणि वनस्पतींचा वापर करून हा काढा तयार करता येतो. काढ्यात भरपूर औषधी गुणधर्म असतात. घरच्या घरी हा काढा कसा तयार करायचा ते पाहूया ?

यासाठी 20 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम काळीमिरी, 20 ग्रॅम सुंठ आणि 40 ग्रॅम तुळशीची पाने हे सर्व साहित्य एकत्र बारीक वाटून घ्या. त्यानंतर हे सर्व साहित्य पाण्यात घालून उकळा. साधारण दोन कपांचे एक पाणी शिल्लक राहील इतके ते उकळू द्या. उकळलेला हा काढा अर्धा अर्धा चमचा दिवसातून तीन चार वेळा प्या. यामुळे सर्दी, खोकला, घसादुखीवर आराम मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या