एचपीचे एआय तंत्रज्ञान असलेले लॅपटॉप लॉन्च, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या…

एचपी या आघाडीच्या कंपनीने एआय तंत्रज्ञान असलेले ‘ओमेन ट्रान्सेंड 14’ आणि ‘एचपी Envy x 365, 14’ लॅपटॉप लॉन्च केले आहेत. गेमर्स आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी हे लॅपटॉप पर्वणीच असणार आहेत.

‘ओमेन ट्रान्सेंड 14’ आणि ‘एचपी Envy x 365, 14’ या दोन्ही लॅपटॉपमध्ये एआयच्या वापरामुळे उत्पादकता वाढेल. ओमेन ट्रान्सेंड 14 मुळे गेमिंगचा अनुभव आणखी चांगला होईल. एआय आधारभूत ऑडिओ आणि व्हीडिओ असल्यामुळे ‘एचपी Envy x 365, 14’ यामुळे कंटेट क्रिएशनच्या क्षेत्रात क्रांती येईल, असे एचपी इंडियाचे कन्झ्युमर सेल्सचे वरिष्ठ संचालक विनित गेहलानी म्हणाले. तर तंत्रज्ञानावर भर देऊन युजर्सला आणखी समृद्ध करणे, तसेच गेमिंग आणि कामही सुकर करणे हे कंपनीचे ध्येय असल्याचे एचपी इंडियाच्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक इस्पिता दासगुप्ता यावेळी म्हणाल्या.

ओमेन ट्रान्सेंड 14 –

गेमिंग आणि कंटेंट क्रिएटरचे काम करणाऱ्यांसाठी हा लॅपटॉप तयार करण्यात आला असून यात NVIDIA GeForce RTX4060 ग्राफिक्स आहेत. यात असणाऱ्या इंटेल प्रोससर्समुळे गेमर्स नवीन गेम्स आणि आव्हानात्मक कामही अगदी लिलया करू शकतात. NVIDIA प्रोसेसर्समुळे लोकल एआय आणि बिल्ट इन एआय अशी दोन्ही वैशिष्ट्ये यात पहायला मिळतात. तसेच Otter.ai मुळे ऑनलाईन मीटिंग किंवा क्लासेसच्या वेळी ट्रान्सक्रिप्शन किंवा कॅप्शन्स देण्याचं कामही एकाचवेळी होऊ शकते. यासह नोट्स काढणे, एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करणेही सहज शक्य होते.

ओमेन ट्रान्सेंड 14 लॅपटॉपमध्ये खास कुलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यासाठी इंटेल कंपनीची मदत घेण्यात आली असून यामुळे 14 इंचाचा हा लॅपटॉप कार्यान्वित असतानाही थंड राहतो. एचपीचा हा सर्वात हलका गेमिंग लॅपटॉप असून याचे वजन 1 किलो 637 ग्रॅम असून आहे. याची बॅटरी लाईफ 11.5 तासांची आहे. टाईप सीPD140W अडाप्टरमुळे चार्जिगही वेगाने होते.

हा लॅपटॉप एचपीच्या सर्व स्टोअर्समध्ये आणि एचपी ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 1, 74, 999 पासून सुरू होते. तसेच हा लॅपटॉप सिरॅमिक व्हाईट आणि शॅडो ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.

Envy x 365, 14 –

Envy x 365, 14 मध्ये असणाऱ्या इंटेल प्रोसेसर्समुळे अडॉब फोटोशॉप वापरणाऱ्यांचीही चांदी होणार आहे. मायक्रोसॉफ्ट को पायलट बटन असलेला पहिला लॅपटॉप आहे. त्यामुळे असिस्टेड सर्च, कंटेट जनरेशन आणि यासारखे अनेक एआय आधारभूत फीचर्स युजर्सला मिळतील. यात विंडोज स्टुडिओ इफेक्ट असल्यामुळे व्हीडिओचा दर्जा वाढेल. तसेच एनपीयूचाही यात समावेश असल्यामुळे ऑटोमॅटिक झुमिंग, क्रॉपिंग हे फीचर्स मिळतात. यामुळे व्हीडिओ कॉल्स दरम्यान आय कॉन्टॅक्ट नीट होऊ शकतो तसेच बॅकग्राऊंड ब्लर होतो.

विशेष म्हणजे एआय आधारभूत प्रायव्हसी फीचर्समुळे युजर स्क्रीन समोरून उठल्यावर स्क्रीन आपोआप लॉक होते आणि कोणी मागे उभा असेल तर स्क्रीनचा लाईट आपोआप डीम होतो. त्यामुळे प्रायव्हसीही जपली जाते.Envy x 365, 14 या लॅपटॉपचे वजन फक्त 1.4 किलो असून याला 14 इंचांचा ओएलएक्स डिस्प्ले आहे. याची बॅटरी लाईफ 15 तासांची असल्याच दावा कंपनीने केला आहे.

हा लॅपटॉपही एचपी स्टोअर्स आणि एचपीच्या ऑनलाईन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 99,999 पासून सुरू होते. हा लॅपटॉप मेटॉरिक सिल्व्हर आणि ॲटमॉस्फरिक ब्ल्यू या रंगात उपलब्ध आहे.