
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेता हृतिक रोशन याचा सुपर30 व अभिनेत्री कंगना रनौत हिचा मेंटर है क्या हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. यावरून कंगना व हृतिकमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आले होते. कंगनाची बहिण रंगोलीने हृतिकवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. त्यामुळे आता हृतिकने या वादातून माघार घेत त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे. मानसिक हिंसाचार व त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने असे केल्याचे सांगत त्याने कंगनावर अप्रत्यक्षरित्या कंगनावर निशाणा साधला आहे.
— Hrithik Roshan (@iHrithik) May 9, 2019
‘मीडियातील सर्कशीपासून माझ्या कामाचा अपमान होऊ नये म्हणून मी माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे. यामुळे मी स्वत:चा मानसिक हिंसाचार व त्रासापासून बचाव केला आहे. माझा चित्रपट पूर्णपणे तयार आहे. तरिही मी निर्मात्यांना लवकरात लवकर नवीन तारीख जाहीर करण्याची विनंती केली आहे’, असे ट्विट त्याने केले आहे.



























































