
मन उडू उडू झालं या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणजेच दीपू या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. दीपू ही प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटते. या व्यक्तिरेखेचं श्रेय मालिकेच्या लेखक आणि दिग्दर्शकांना जातं, अशी भावना हृताने व्यक्त केली. हृता म्हणाली, या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेचं श्रेय पडद्यामागच्या सूत्रधारांना जातं. मी खरंतर ती व्यक्तिरेखा म्हणून फक्त दिसते, पण हे प्रत्येक पात्र उभं करण्यात लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा मोठा वाटा असतो. मला मंदार देवस्थळी यांच्यासारखे चांगले दिग्दर्शक मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.


























































