सोमवारपासून बारावी परीक्षेचे हॉलतिकीट मिळणार

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने सोमवार, 22 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकिटाची प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊन नये. हॉलतिकिटाची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक-प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करून द्यावी, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास महाविद्यालयांनी हॉलतिकिटाची दुसरी प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी. त्यावर लाल शाईने डुप्लीकेट असा शेरा लिहून द्यावे. तसेच हॉलतिकिटावर माध्यम, विषय, विद्यार्थ्याचा पह्टो, नाव यात काही त्रुटी असल्यास विभागीय मंडळात जाऊन दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.