
बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत आलेल्या चुकीच्या प्रश्नाचे गुण मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील अ-5 या प्रश्नाला सूचनाच प्रिंट झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना 1 गुण दिला जाणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1 मधील अ-5 मध्ये बॉस मेंबर व सीएमच्या संयुक्त सभेतील शिफारसीनुसार असे दोन सेन्टेन्स देऊन ते सिम्पल करायचे होते. मात्र त्यासाठी सूचना प्रश्नपत्रिकेवर प्रिंट झाली नव्हती. तर काही विद्यार्थ्यांना पहिल्या प्रश्नासोबतच प्रश्न क्रमांक 2 आणि 4 मध्ये दोन्ही विषय सारखेच आले होते.
























































