
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील माटुंग्याच्या पश्चिम भागातील बिग बाझारमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच अजून या दुर्घटनेत जिवीतहानीचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप कळालेले नाही.
सविस्तर वृत्त लवकरच

























































