नगर दक्षिण जिल्हा विहिंप व बजरंग दल आयोजित २० डिसेंबरला भव्य हुंकार सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर दक्षिण जिल्हा विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने गुरुवार दिनांक २० डिसेंबर रोजी गांधी मैदान, नगर येथे सायंकाळी ६ वाजता भव्य हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारण्याबाबतची जनभावना प्रकट करण्यासाठी आणि मंदिर निर्माणातील बाधा दूर हटविण्यासाठीच साधू संतांनी हुंकार सभेचे आयोजन केले आहे. केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा पारित करून श्रीराम मंदिर निर्माणच मार्ग प्रशस्त व्हावा. या करिता देशभरात प्रत्येक जिल्ह्यातून हिंदू बांधवाना आवाहन करण्यासाठी हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या सभेचे प्रमुख वक्ते विश्व् हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर हे आहेत. तसेच प.पु. प्रज्ञा चक्षु ह.भ.प.मुकुंदकाका जाटदेवळेकर (पाथर्डी), सज्जनगडचे महंत मोहनबुवा रामदासी, देवगड संस्थानाचे ह.भ.प.भास्करगिरी महाराज( नेवासा ), जोग महाराज संस्थानाचे ह.भ.प.श्रीराम महाराज झिंजुर्के यांच्या शुभाशीर्वादाने हुंकार सभा होणार आहे. तरी हिंदू बांधवानी लाखोंच्या संख्येने हुंकार सभेला उपस्थित राहून हिंदू शक्तीचे दर्शन केंद्र सरकारला घडवून द्यावे, असे आवाहन नगर दक्षिण जिल्हा विश्व् हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री डॉ.प्रदीप उगले, जिल्हा सहमंत्री गजेंद्र सोनवणे, शहरमंत्री अनिल देवराव, बजरंगदल जिल्हा संयोजक गौतम कराळे, प्रांत प्रचार प्रसिद्धी सदस्य अमोल भांबरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. न. ९०११८२३८९५,९४२२७२७७२६,७३८७७७७३८३,९८६०१४४५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.