हैद्राबादमध्ये गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आमदाराच्या मुलाचा सहभाग?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणामधील हैद्राबाद शहरात एका मर्सिडीज गाडीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही कार एका आमदाराची असल्याचे बोलले जात आहे. या आमदाराच्या मुलाचा देखील बलात्कारात सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

हैदराबादमधील जुबली हिल्समधील एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जुबली हिल्समधील क्लबमध्ये एका पार्टीत सदर मुलीची या तरुणांसोबत ओळख झाली होती. त्या मुलांनी तिला स्वत:सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर जेव्हा ती गाडीत बसली त्या सर्व मुलांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

ही घटना 28 मे रोजी घडली असून मुलीच्या वडिलांनी आज या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत 354 आणि 376 कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पीडित मुलीने एका तरुणाची ओळख पटली असेल असे समजते.