
सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओंची कमी नसते. असाच एक व्हिडीओ पुनः पुन्हा पाहावा वाटत आहे. हा व्हिडीओ आहे तरंगत्या बिर्याणीचा.
हैदराबादमधील नवाब साहब पुंता परिसर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. तेथील अबिदा हॉटेलमधील बिर्याणीचे भांडे पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. एकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि बघता बघता नेटिजन्सच्या पसंतीला उतरला. बिर्याणीचे भांडे पाण्यावर तरंगत जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. जणू काही ते स्वतःच तरंगत डिलिव्हरीसाठी निघाले आहे. व्हिडीओ बघून लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. व्हिडीओला आतापर्यंत लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.




























































