मी थेट नाही म्हणत नाही… राजकारणात येण्याच्या प्रश्नावर माजी सरन्यायाधीशांचे स्पष्ट उत्तर

देशातील न्यायवस्थेकडे नागरिकांचे लक्षं असते. न्यायाधीश काय निर्देश किंवा आदेश देतात याचा देशातील व्यक्ती, कुटुंब, राजकारण, शासन यंत्रणा, संस्था अशाच सर्वच घटकांवर परिणाम होत असतो. हिंदुस्थानात लोकशाही पद्धती असून न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. अशा वेळी न्यायव्यवस्थेतील आपली सेवा पूर्ण केल्यानंतर न्यायाधीश राजकारणात आल्यास चर्चेचा विषय होतो. याच संदर्भात एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान माजी सरन्यायाधीश यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.

हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एनडीटीव्ही मराठीला सविस्तर मुलाखत दिली. यावेळी राजकारणात येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ‘सध्या माझ्या मनात काहीही विचार नाही. मी फार पुढचा विचार करत नाही. मी थेट नाही यासाठी म्हणत नाही कारण ‘What is in store noboday knows’. त्यावेळी मी विचार केला आणि विचार बदलला तर तुम्हीच म्हणाल की 2/3 वर्षांपूर्वी तुम्ही नाही म्हणाला होतात’, असं म्हणत राजकारणाच्या क्षेत्रात येण्याचे दरवाजे खुले ठेवले आहेत.

निवृत्तीनंतर राजकीय भाष्य करणाऱ्या न्यायमूर्तींबद्दल त्यांनी म्हटलं की, ‘सध्याचे एक न्यायमूर्ती आहेत, जे नंतर सरन्यायाधीश होणार आहेत. मी त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. पण ते असं म्हणतात की जजेस शूड स्पीक लेस अँड जजेस शूड स्पीक मोअर लेस आफ्टर रिटायरमेंट’.