मोदींचा इगो दुखावू नये म्हणून त्यांना सर म्हणतो : चंद्राबाबू नायडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमरावती

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राज्याच्या भल्यासाठी आपण मोदींना सर म्हणतो असे नायडू यांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे अन्यायपूर्ण विभाजनानंतर राज्याला विशेष दर्जा मिळवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

नायडू म्हणाले, “जेव्हा मी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बिल क्लिंटन यांना भेटलो तेव्हा त्यांना मी मिस्टर क्लिंटन म्हटले होते सर नाही. मोदी राजकारणात मला ज्युनियर आहेत. जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा मी त्यांना सर म्हणू लागले. हे मी राज्यासाठी केले, जेणेकरून त्यांचा इगो हर्ट होऊ नये आणि त्यांच्याकडून राज्यावर कुठलाच अन्याय होऊ नये.”

तसेच राज्याच्या भल्यासाठी 2014 साली भाजपसोबत आघाडी केल्याचे नायडू यांनी म्हटले. जर 2014 ला स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवली असती तर आपल्या 10 जागा जास्त निवडून आल्या असत्या असेही नायडू यांनी नमूद केले.