आयपीएलपेक्षा देशासाठी खेळणे पसंत करीन -विलियम्सन

तशीच वेळ आली तर पैशांसाठी आयपीएल क्रिकेट लीगमध्ये खेळण्याऐवजी मी देशासाठी कसोटी खेळणे पसंत करीन, असे देशप्रेमी वक्तव्य न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांने केले आहे. न्यूझीलंड संघ 2 जून आणि 14 जूनला लॉर्ड्स व एजबॅस्टनवर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. पण त्याच काळात जूनपर्यंत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारले असता विलियम्सन म्हणाला, लीग क्रिकेटपेक्षा मी नेहमीच देशाच्या संघासाठी खेळायला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे तशीच वेळ आली तर आयपीएल सोडून न्यूझीलंड संघाच्या सेवेत मी स्वतः सहभागी होईन असे विलियम्सन म्हणाला.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या