तुकाराम मुंढे यांचा धसका, नागपूर महापालिकेची इमारतच धुवून काढली

4486

नागपूर महापालिकेत महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे आज आपला पदभार स्वीकारणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक सुरू झाली होती. संपूर्ण इमारत पाण्याने धुवून चकाचक करण्यात आली. कधी वेळेवर न येणारे कर्मचारीही आज कार्यालयात आपल्या वेळेतच येऊन बसले होते. तुकाराम मुंढे यांचा धाक इतका जबरदस्त असल्यामुळे महापालिकेची यंत्रणा आज कामाला लागलेली दिसली.

आज महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आलेच नाहीत तेव्हा कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून येणार त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी चालविली आहे तर गेल्या 7 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये धडकी भरली आहे. कर्मचाऱयांनी तुकाराम मुंढे यांच्या शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र आज बघायला मिळाले. राज्यात सत्ता बदलापासूनच तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त म्हणून येणार असल्याची चर्चा होती. आज आयुक्त पदाचा पदभार ते स्वीकारणार म्हणून महापालिकेतील अधिकाऱयांपासून सर्व कर्मचारी वेळेतच कार्यालयात दाखल झाले होते. उशिरा येणाऱया कर्मचाऱयांना वठणीवर आणण्यासाठी ते प्रसिद्ध असल्यामुळे कर्मचाऱयांनी धसका घेतला आहे. नागपूरच्या नागरिकांमध्ये ते येणार असल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेतील भोंगळ कारभार बंद होऊन सर्वसामान्यांची कामे सहज होतील असा नागरिकांना विश्वास आहे. राजकारणाच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासीयत आहे. शहरात राजकारणी लोकांनी अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे बसवून ठेवली आहेत त्याला मुंढे यांच्या आगमनामुळे आळा बसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या