
ICC Women’s World Cup 2025 हिंदुस्थान आणि श्रीलंकेच्या संयुक्त आयोजनामध्ये खेळला जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली आहे. अशातच ICC ने एक ऐतिहासिक निर्यण घेत क्रीडा विश्वाला सुखद धक्का दिला आहे. पहिल्यांदाच महिला विश्वचषकाची संपूर्ण जबाबदारी महिलांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या महिला विश्वचषकात ‘नारीशक्ती’चा बोलबाला पाहायला मिळणार आहे.
महिला विश्वचषकाला 30 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया आपला पहिला विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिलाच सामना टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये आसाममधील बर्सापार क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात पंचांपासून ते सामनाधिकाऱ्यापर्यंत सर्वच महिला असणार आहे. ICC ने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, सामनाधिकारी म्हणून चार महिलांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हिंदुस्थानच्या माजी क्रिकेटपटू आणि पहिल्या महिला सामनाधिकारी जीएस लक्ष्मी यांचा समावेश असून अन्य तीन महिलांमध्ये टुडी अँडरसन, शँड्रे फ्रिट्झ, मिशेल परेरा यांचा समावेश आहे. तसेच सामन्याच्या अधिकृत पंचांमध्ये हिंदुस्थानच्या माजी खेळाडू वृदां राठी, एन जनानी आणि गायत्री वेणुगोपालन यांना समावेश आहे. यांच्याव्यतिरिक्त लॉरेन एनेनबॅग, कँडेस ला बोर्डे, किम कॉटन, सारा डंबनेवान, शथिरा झाकीर जेसी, करिन क्लास्ते, निमाली परेरा, क्लेअर पोलोसाक, स्यू रेडफर्न, एलॉइस शेरीडन आणि जॅकलिन विल्यम्स यांचा समावेश आहे.
महिला विश्वचषकाला 30 सप्टेंरपासून सुरुवात होणार आहे. विश्चषक उंचावण्यासाठी 8 संघ एकमेकांना कडवी झुंज देतील. हिंदुस्थानचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल. त्यानंतर दुसरा सामना 5 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध, 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 20 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध, 24 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटचा सामना 26 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. तसेच स्पर्धेची पहिली सेमी फायनल 29 ऑक्टोबर रोजी आणि दुसरी सेमी फायनल 30 ऑक्टोबर रोजी खेळली जाईल. त्यानंतर विश्वचषक उंचावण्यासाठीची अंतिम लढत 2 नोव्हेंबरला होणार आहे.