ICC T20 WC 2026 – यूएईने उघडले विजयाचे खाते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये अखेर विजयाचे खाते उघडले. त्यांनी अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत कॅनडावर 5 गडी राखून मात केली. जुनैद सिद्दिकीचे 5 बळी अन् आर्यांश शर्मा व सोहैब खान यांची अर्धशतके ही यूएईच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. बळींचा पंच लगावणारा जुनैद या विजयाचा शिल्पकार ठरला.

पहिल्या विजयासह यूएई संघ आता ‘ड’ गटात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कॅनडाने नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजीचा करताना 20 षटकांत 7 बाद 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूएईने 151 धावांचे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून गाठले. सलामीवीर आर्यांश शर्माने नाबाद 74 धावांची संयमी व निर्णायक खेळी केली. आघाडीची फळी अपयशी ठरल्याने यूएईची एकवेळ 4 बाद 66 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर सोहैब खानने 51 धावांचे अर्धशतक झळकावत आर्यांशला महत्त्वाची साथ देन यूएईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.