T20 WC 2022 वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे मंत्री, क्रिकेटपटू प्रचारासाठी हिंदुस्थानात; पर्यटकांची होणार चंगळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे मिनिस्टर फॉर टुरिझम रॉजर कूक आणि टूरिझम डब्ल्युएच्या मॅनेजिंग डायरेक्टर कॅरोलिन टर्नबुल प्रचारासाठी हिंदुस्थानमध्ये आल्या आहेत. शुक्रवारी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी टूरिस्टसाठी वर्ल्डकपदरम्यान काही खास गोष्टींची योजना आखल्याचे सांगितले.

हिंदुस्थान वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी प्राधान्यक्रमाची बाजारपेठ असल्याचे यावेळी रॉजर कूक म्हणाले. आगामी वर्ल्डकप काळामध्ये हिंदुस्थानातून सर्वाधिक पर्यटक येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जुलै आणि ऑगस्टमधील बुकिंगमध्येही कोरोना काळापेक्षा वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदुस्थानी पर्यटक समुद्रकिनारे, निसर्ग आणि वन्यजीवन, लोकल फूड आणि कौटुंबिक राहण्याच्या ठिकाणी भेट देण्यासाठी उत्सुक असतील. यासाठी आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले.

विराट दडपणाखाली, तर टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू विध्वंसक फलंदाज; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे विधान

टूरिझम डब्ल्युएच्या मॅनेजिंग डायरेक्टर कॅरोलिन टर्नबुल यांनी यावेळी पर्यटकांना आकर्षिक करणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या. पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतींसाठी पर्यटक मोठ्या संख्येने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला भेट देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याच मैदानात हिंदुस्थानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

ब्रॅड हॉगने देखील पर्यटकांसाठी पर्थचे मैदान आजूबाजूच्या भागाबाबत माहिती दिली. पर्यटक आपल्या कुटुंबासोबत या भागात क्रिकेटसह फिरण्याचा, खाण्याचा, राहण्याचा निखळ आनंद घेऊ शकतात.