जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरने कॅरी रक्तबंबाळ, मैदानातच घेतले उपचार

17


सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात बर्मिंघमच्या मैदानात सुरू आहे. या लढतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकलेल्या बाऊन्सरवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅलेक्स कॅरी रक्तबंबाळ झाला.

जोफ्रा आर्चरच्या सातव्या षटकातील सहावा चेंडू अॅलेक्सच्या थेट हनुवटीवर आदळला. चेंडूचा वेग एवढा होता की अॅलेक्सने घातलेले हेल्मेटही निघाले. रक्तबंबाळ झालेल्या अॅलेक्सला पाहून क्रीडाप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला. अॅलेक्सच्या हनूवटीतून रक्त येत असल्याचे पाहूनऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय पथकाने मैदानातनं धाव घेतली. हनुवटीतून रक्त वाहत असतानाही मैदानाबाहेर न जाता अॅलेक्सने तेथेच उपचार घेतले. हनुवटीला बँडेज लावून अॅलेक्सने खेळ सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आणि स्टेडियमवर उपस्थित चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात अॅलेक्सच्या लढवय्या वृत्तीला दाद दिली.

आपली प्रतिक्रिया द्या