वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंतिम सामन्यातील फटकेबाजीनंतर क्रिकेट बोर्डाची धक्कादायक मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद फलंदाजी केली. 15 षटकार, 15 चौकारच्या जोरावर वैभवने 80 चेंडूत 175 धावा ठोकल्या. वैभवच्या या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण क्रिडा विश्वास खळबळ उडवली. त्यादरम्यानच आईसलँड देशाच्या क्रिकेट बोर्डाने एक मजेशीर मागणी केली आहे.

आईसलँड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत वैभव सूर्यवंशीला अटक करा अशी मागणी केली आहे. ”गोलंदाजांवर अत्याचार केल्याप्रकरणी वैभव सूर्यवंशीला तत्काळ अटक करा”, अशी पोस्ट या क्रिकेट बोर्डाने शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.